वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात अनुसूचित जातीच्या लाभाथ्यर्थ्यांसाठी असलेल्या रमाई घरकुल आवास योजनेतील ५७७ घरकुलाचा पहिला हप्ता वितरण करण्यांत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने हे लाभाची अडचणीत सापडले आहेत. ही सर्व कामे अद्याप प्रलंबित आहेत.
घरकुल राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या लाभाथ्यर्थ्यांसाठीची रमाई आवास योजना वैजापूर तालुक्याची घरकुल गेल्या तीन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मोकळे, दीपक खिल्लारे, बाळासाहेब गायकवाड यांनी जिल्हा ग्रामीण यंत्रणा व समाज कल्याण विभाग यांच्याकडे तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घरकुल योजनेच्या बाबतीत लवकरच कमिटी गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. समाज कल्याण विभागाकडे आंदोलनाचे निवेदन देखील त्यांनी प्रशासनाला दिलेले होते. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरला संजय शिरसाट व सर्व कमिटीने ५७७ वैजापूर तालुक्यातील घरकुलांना मंजुरी दिली व तसा आदेश गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैजापूर यांना देण्यात आला.
या योजनेचे लाभार्थी हे सर्व अनुसूचित जाती घटकातील गोरगरीब लोक आहेत. ही घरकुले मंजूर होऊन पाच महिने उलटून गेले आहेत. पंचायत समिती स्तरावर देखील मोकळे यांनी पाठपुरावा केला. जिला परिषद, पंचायत समिती नगर पालिका यांची आचारसंहिता लागल्यामुळे ज प्रश्नाकडे पुन्हा दुर्लक्ष झाले. रमाई आवास योजनेचे वैजापूरचे ५०० घरकुलांचा मंजुरीचा आदेश होऊन पाच महिने उलटून गेलेले आहेत. परंतु, घरकुल विभागाने पहिला हप्ता वितरित करण्याची कुठल्याही येत आहे. प्रकारची तयारी केली नसल्याचे दिसून येते.












